Achievements Of Divisional Commissioner
शैक्षणिक पात्रता :
  • बी.ए.एल.एल.बी.
विविध पदावरील पदस्थापनेचा तपशील
  • 1980-85 उपजिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर/गडचिरोली जिल्हा
  • 1985-89 उपविभागीय अधिकारी, हवेली (पुणे)
  • 1989-92 जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा
  • 1992-97 पुणे महानगरपालिका
  • 1997-2001 उपसचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई., उपसचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई., उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई., उपसचिव, मा.मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई., नियंत्रक, शिधावाटप, मुंबई.
  • 2001-03 मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड
  • 2003-05 अपर आयुक्त, कोकण विभाग, कोकण.
  • 2005-07 सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कॉटन फेडरेशन, मुंबई
  • फेब्रु.2007 ते सप्टे.2010 आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई.
  • 11 ऑक्टो.2010 पासून महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
  • 1 जाने. 2011 पासून सचिवस्तर- स्थानापन्न पदोन्नती महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
  • 18 मे 2012 पासून विभागीय आयुक्त, कोकण विभाग
आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका पदावर कार्यरत असताना प्राप्त पुरस्कारांची संक्षिप्त माहिती
  • • मा.पंतप्रधान यांच्या हस्ते नागरी सेवा दिन-2011 (Civil Service Day-2011) प्रशासनातील उल्लेखनीय कामानिमित्त (e.t.c.अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केल्याबद्दल) 2009-10 चा पंतप्रधान पुरस्कार दि.21 एप्रिल 2011 रोजी प्रदान.
  • • केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाच्या वतीने सन्माननीय राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते नवी मुंबई महानगरपालिकेचा 'राष्ट्रीय नागरी जलपुरस्कार 2009' प्रदान करून राष्ट्रीय पातळीवर सन्मान.
  • • केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाच्या वतीने 'राष्ट्रीय नागरी जलपुरस्कार 2008' ने देशपातळीवर गौरव.
  • • केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून सन 2008-09 साठी सांडपाण्याची सुयोग्य विल्हेवाट लावून जलप्रदूषणाला प्रतिबंध करणारे तसेच सुयोग्य शौचालय व्यवस्थापन राबविणारे देशातील सर्वाेत्तम शहर म्हणून 'Best City Award for Improvement in waste water & sanitation services' या विशेष राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.
  • • महाराष्ट्र शासनातर्फे मा.मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते 'संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान' अंतर्गत दिला जाणारा 50 लक्ष रुपयांचा प्रतिष्ठेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दोन वेळा प्राप्त.
  • • केंद्र शासनाच्या 'सर्वशिक्षा अभियान' अंतर्गत सन 2007-08, 08-09 व 09-10 या कालावधीत सलग तीन वर्षे राज्यातील 'सर्वोत्तम महानगरपालिका' म्हणून सन्मान प्राप्त.
  • • पर्यावरणविषयक उल्लेखनीय कामांची नोंद घेत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या वतीने पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी जागतिक पर्यावरणदिनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते 'वसुंधरा पुरस्कार 2009' प्रदान.
नवी मुंबई महानगरपालिकेत राबविलेले महत्त्वाचे / उल्लेखनीय प्रकल्प व कामे
  • • नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेली पाणीपुरवठा व्यवस्था ही देशातील 'सर्वोत्तम पाणीपुरवठा व्यवस्था'.
  • • देशातील सर्वोत्तम 'मलप्रक्रिया केंद्र' (Sewage Treatment Plant)
  • • देशातील सर्वोत्तम 'घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा'.
  • • देशातील सर्वोत्तम 'क्षेपणभूमी' (Landfill Site)
  • • केंद्र शासनाकडून 'Jn-NURM' अंतर्गत सुमारे 700 कोटी रुपयाचे पाच प्रस्तावांस मंजूरी प्राप्त केली. ही सर्व कामे सध्या प्रगतीपथावर.
  • • 'आरोग्य व्हिजन', 'शाळा व्हिजन', 'गार्डन व्हिजन', 'रस्ते व्हिजन' इत्यादी उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी .
Overview
Divisional Administration
Divisional Map
OrganizationTree
District Administration
Location
Information Rights
Tourism
Telephone Numbers
Important Links
Tenders & Notifications
Orders
Achievements
News and Events