Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
डहाणू आणि बोर्डी किनारा

डहाणू आणि बोर्डी किनारा

Dahanu Bordi Beach

डहाणू हे पालघर जिल्ह्यात वसलेले किनारी शहर आहे. डहाणूमधील मुख्य पर्यटक आकर्षण म्हणजे डहाणू-बोर्डी किनारा. हा प्रसिद्ध किनारा मुंबईपासून १४५ किमी वर आहे. त्याची लांबी १७ किमी आहे. डहाणू-बोर्डी किनारा चिकूसाठी प्रसिद्ध आहे. पारसी लोकांच्या दृष्टीने देखील हे एक महत्वाचे धार्मिक ठिकाण आहे.

बोर्डी हे ठिकाण डहाणूपासून अर्ध्या तासावर आहे. उन्हाळ्यात देखील संपूर्ण किनाऱ्यावर थंडगार वारे वाहात असतात.

डहाणू आणि बोर्डी किनाऱ्यासाठी नजिकचा विमानतळ मुंबई आहे, तर नजिकचे रेल्वे स्थानक डहाणू रोड आहे, जे मुंबईपासून अंदाजे तीन तासांच्या अंतरावर आहे.

डहाणू आणि बोर्डी किनाऱ्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई – (वेस्टर्न एक्सप्रेसवे) – दहीसर – मनोर – चारोटी - डहाणू

पुणे – पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे – लोणावळा – खोपोली – रसायनी – ठाणे – वसई – डहाणू.

मुंबई ते डहाणू अंतर १४० किमी
पुणे ते डहाणू अंतर २६५ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक डहाणू आहे.