Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
बागायत, मासेमारी आणि मीठ उत्पादन

 
बागायत
 

डहाणू हे बागायतीसाठी आणि त्यातही चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या सुमारे शतकभरापासून डहाणू हे चिकू उत्पाीदक शेतकऱ्यांचे ठिकाण राहिले आहे. चिकू हे उष्ण कटिबंधातील सुंदर फळझाड आहे. चिकूचा उगम मध्य अमेरिकेतील आणि ते दक्षिण मेक्सिकोमध्ये विपुल प्रमाणात आढळतात. डहाणू, घोलवड आणि बोर्डी येथील चिकू ट्रेनने मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, उदयपूर आणि पुण्याला पाठविण्यात येतात.

तसेच नारळ, आंबा, लिची, पेरू, द्राक्ष, सफरचंद, ताडगोळे, काजू ही फळेही येथे होतात. इतक्या विविध प्रकारची फळे इथे कशी होतात हेही एक आश्चर्यच आहे. बागायत हा अन्य प्राथमिक उद्योगामध्ये, एक अधिकच्या उत्पन्नाचे साधनही झाला आहे. नर्सरी, गांडुळखत, पर्यावरणीय पर्यटन आदी गोष्टीं येथे केल्या जातात.


मासेमारी आणि मीठ उत्पादन
 

डहाणूच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे मासेमारी हा येथील अनेक वर्षांपासून चालत आलेला व्यवसाय आहे. तसेच एक मोठा गट मीठ उत्पादनावरही अवलंबून आहे.

संपूर्ण किनारपट़्टी नैसर्गिक साधनांनी संपन्न आहे. खाडी, पाणथळ जमिनी, तिवर आणि नद्यांचा त्रिभूज प्रदेश आदी सर्व गोष्टी मासेमारीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. कोळी, मिठना, मांगेला या जाती हे व्यवसाय करतात. ते दर्याचे राजे आहेत आणि दरवर्षी हजारो टन माशांची निर्यात करून ते चांगला महसूल मिळवुन देतात. डहाणूत मासेमारांच्या सुमारे २१ वाड्या आणि ७ मासे ठेवण्याची केंद्र आहेत. खोल समुद्रातील मासेमारी, उथळ पाण्यातील मासेमारी आणि खाडीतील मासेमारी अशा तीन पद्धतीने मासेमारी चालते.
धारा, घोळ, कोठ, कॅटफिश, थ्रेड फिन्स, पाइपफिश, पापलेट, म्हाकूळ, रेज़, क्रोकर, सरडाइन्झ, मडस्कीपर्स, लॉबस्टर्स, खेकडे आदी अनेक प्रकारचे मासे येथून मिळतात.