दापोली पर्यटक आकर्षणे
|
मुरुड किनारा
|
|
हा किनारा दापोलीपासून १० किमी वर आहे. काहीवेळा याला मुरुड-हर्णे असे देखील म्हणतात.
मुरूड किनाऱ्यावरील वाळू मऊ आहे, झुलणारे माड आणि सुंदर दुर्गा देवी मंदीर येथे आहे.
चालणे, जॉगिंग किंवा केवळ भटकंतीसाठी हा किनारा अतिशय योग्य आहे. मुरुड हे भारत रत्न
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्म स्थान आहे.
|
|
हर्णे बंदर, गोवा किल्ला, फतेगड किल्ला, कनकदुर्ग किल्ला, लाईट हाऊस
|
|
हर्णे बंदर दापोलीपासून १५ किमी आहे. इथे दररोज होणारा माशांचा लिलाव प्रसिद्ध आहे.
हर्णे इथे अनेक किल्ले आहेत, सुवर्णदुर्ग, फतेहगड, आणि गोवा किल्ला, बंदराजवळच लाईट
हाऊस आहे. कनकदुर्ग किल्ल्याच्या सर्वोच्च बिंदूवर जुने लाईटहाऊस आहे. येथून मासेमारी
नौका, सुवर्णदुर्ग किल्ला आणि सुंदर सूर्यास्ताचं दृश्य दिसते. गोवा किल्ला हर्णे बंदराच्या
वाटेवर आहे. प्रचंड काळ्या दगडाच्या भिंतीद्वारे तो ओळखता येतो.
|
|
सुवर्णदुर्ग, हर्णे
|
|
सुवर्णदुर्ग, अर्थात सोनेरी किल्ला, हा सर्व बाजूंनी समुद्राने वेढलेला एक किनारी किल्ला
आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये तो जिंकला. सुवर्णदुर्ग किल्ला अत्यंत उंच
भिंतीने वेढलेला आठ एकरांचा परिसर आहे. मराठा आरमाराच्या नौका बांधणीचं काम येथे केले
जात असे.
|
|
केळशी
|
|
केळशी हे लहानसे गाव रायगड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. हे गाव पाण्याने वेढलेले
असल्यामुळे एखाद्या बेटासारखे दिसते. इथे सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदीर, गणेश मंदीर
आणि सुंदर किनारा आहे.
|
|
दापोली कोकण कृषी विद्यापीठ
|
|
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कूषि विद्यापीठ दापोलीपासून ५ किमी अंतरावर आहे. कूषिविषयक
शिक्षण आणि संशोधन ही या विद्यापीठाची मुख्य उद्दिष्टे आहेत. कोकण कूषि विद्यापीठाला
१२ फेब्रुवारी २००१ रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कूषि विद्यापीठ हे नाव दिले गेले
.
|
|
पन्हाळेकाजी गुंफा
|
|
मनुष्याद्वारे निर्मित या सुप्रसिद्ध ऐतिहासिक गुंफा दापोलीपासून ४० किमीवर आहेत. पन्हाळकाजी
गुंफांमध्ये एकंदर २९ दगडात कोरलेल्या गुंफा आहेत. त्यामध्ये गणेश, सरस्वती यांच्या
मूर्ती, रामायण आणि महाभारतामधील प्रसंग पाहता येतात. इथे मासेमारी आणि पोहण्याचा आनंद
देखील घेता येतो.
|
|
उन्हेरे
|
|
उन्हेरे हे नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. इथे अनेक पर्यटक नैसर्गिक
गरम पाण्यात स्नान करण्यासाठी येतात. हे ठिकाण टेकड्या, सुंदर जंगल आणि दूरवर पसरलेल्या
शेत जमिनींनी वेढलेले आहे. गरम पाण्याचे हे झरे पवित्र मानले जातात आणि येथे अनवाणी
जावे लागतं.
|
|
दापोलीला कसे पोहोचाल
|
प्रवास मार्ग
दापोलीला पोहोचण्यासाठी प्रवास मार्ग उत्तम आहे
मुंबई ते दापोली : मुंबई – पनवेल – पेण –
माणगाव – लोणेरे फाटा – गोरेगाव – आंबेत – शेणाळे – मंडणगड – दापोली.
पुणे ते दापोली : याचे तीन मार्ग आहेत.
पुणे ते दापोली ताम्हिणी घाटमार्गे (२२० किमी):
पुणे – पौड – मुळशी – डोंगरवाडी – ताम्हिणी घाट – विळे – निजामपूर – माणगाव – लोणेरे
फाटा – गोरेगाव – आंबेत – म्हाप्रळ – शेणाळे – मंडणगड – दापोली
पुणे ते दापोली महाबळेश्वरमार्गे (२५० किमी):
पुणे – शिरूर पांचगणी – महाबळेश्वर – पोलादपूर – भारणा नाका – खेड – फुरूस – वाकवली
– दापोली
पुणे ते दापोली भोर घाटमार्गे (२०० किमी) :
पुणे – खेड शिवापूर – भोर – वरंधा घाट – लाटवण - दापोली
रेल्वे मार्ग
नजिकचे रेल्वे स्थानकः खेड
|