Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
हरिहरेश्वर किनारा

हरिहरेश्वर किनारा

harihareshwar Beach

हरिहरेश्वर किनारा हा मंदीर आणि आसपासच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखतात. हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी असलेल्या टेकडीला हरिहर किंवा पुष्पाद्री असे देखील म्हणतात. या मंदीरात ब्रह्मा – विष्णू – महेश आणि देवी पार्वतीच्या मूर्ती आहेत. परिसरात श्री कालभैरव आणि श्री योगेश्वरीची मंदीरं आहेत.

हरिहरेश्वर किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी बोटींग, सेलींग, पोहणे, बीच व्हॉली बॉल आणि बीच वॉकींग टूर्स अशा अतिशय लोकप्रिय सुविधा उपलब्ध आहेत. हरिहरेश्वर किनारा मुंबईपासून सुमारे २०० किमी वर आहे.

हरिहरेश्वर किनाऱ्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई – पनवेल – पेण – वडखळ नाका – नागोठणे – कोलाड – माणगाव – मोरबा – साई – म्हसळा - हरिहरेश्वर

पुणे – पौड – ताम्हिणी घाट – विळे फाटा – निजामपूर – माणगाव – मोरबा – साई – म्हसळा - हरिहरेश्वर

मुंबई ते हरिहरेश्वर अंतर २१५ किमी
पुणे ते हरिहरेश्वर अंतर १७५ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक माणगाव आहे, जे हरिहरेश्वरपासून ६५ किमी वर आहे.

हरिहरेश्वर किनाऱ्यावर स्थलदर्शन