Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
जव्हार हिल स्टेशन

जव्हार हिल स्टेशन

Jawhar Hillstation

जव्हार हिल स्टेशन महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात आहे. नितांत सुंदर दऱ्या-खोऱ्या, घनदाट समृद्ध जंगले आणि सुखद हवामानाची देणगी या ठिकाणी आहे. जव्हार हे वारली चित्रकलेसाठी सुप्रसिद्ध आहे. जव्हारला पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर देखील म्हणतात. हे नाशिकपासून ८० किमी तर मुंबईपासून १८० किमीवर आहे. जव्हारच्या आसपास काही पर्यटन स्थळे म्हणजे जय विलास महाल, भूपतगड किल्ला, दादर-कोप्रा आणि पलुसा धबधबे, हनुमान आणि सनसेट पॉईंट्स आणि शिर्पामड. जव्हारच्या जवळचा विमानतळ मुंबई आणि नजिकचे रेल्वे स्थानक इगतपुरी मध्य रेल्वेवर ६१ किमीवर आहे परंतु नाशिक जास्त सोयीचे आहे.