Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य

कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य

karnala_birds

कर्नाळा हे कोकणतील पक्षी अभयारण्य आहे. मुंबईपासून अंदाजे ५० किलोमीटरवर आहे. त्याचं क्षेत्र ४.८ चौरस किलो मीटर आहे. पश्चिम घाटांच्या डोंगराळ मालिकेत वसलेलं आहे आणि अनेक टेकड्यांनी वेढलेल असल्यामुळे ट्रेकर्ससाठी पर्वणी आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य हे कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याला आहे आणि पक्षी निरीक्षकांसाठी एक पर्वणी आहे.

Karnala Fort

कर्नाळा किल्ला १३ व्या शतकात बांधण्यात आला. गर्द झाडीच्या मध्यभागी एका उंच सुळक्याला या किल्ल्यानं वेढा घातला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर हत्ती आणि वाघांच्या अनेक कोरीव आकृती आहेत. दगडांमध्ये नैसर्गिक पाण्याची टाकी आहेत.

कर्नाळ्याला कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई ते कर्नाळाः मुंबई-पनवेल-कर्नाळा

पुणे ते कर्नाळाः पुणे-लोणावळा-कर्नाळा

मुंबई ते कर्नाळा अंतर ६० किमी
पुणे ते कर्नाळा अंतर १२० किमी