Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
कुलाबा किल्ला (अलिबाग)

कुलाबा किल्ला (अलिबाग)

Kulaba Alibag Fort

अलिबाग शहराजवळ दगडाच्या बेटावर बांधलेला, मुंबईच्या दक्षिणेस ११२ किमी वरील, कुलाबा किल्ला एक भव्य रचना आहे, उत्तर-दक्षिण अंदाजे २७५ मीटर्स आणि पूर्व-पश्चिम १०० मीटर्स अशी त्याची लांबी आहे. ओहोटीच्या वेळेस तुम्ही समुद्रातून चालत किल्ल्यापर्यंत जाऊ शकता. या किल्ल्याच्या भिंतीची उंची विविध ठिकाणी ६ ते ८ मीटर्स आहे. १७ बुरुजांसह एक रूंद संरक्षक भिंत याला आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वारे, महा दरवाजा, ईशान्य कोपऱ्यात आहे आणि शहराच्या दिशेने त्याचे तोंड आहे. या लाकडी दरवाजामध्ये भक्कम लोखंडी खिळे ठोकलेले आहेत. दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा देखील आहे. या किल्ल्याचं बांधकाम चुनखडी न वापरता केलेलं आहे. किल्ल्याच्या आतमध्ये एक गोड्या पाण्याची टाकी, एक विहीर आणि अनेक मंदीरं आहेत. संरक्षक भिंतीच्या उत्तर कोपऱ्यात, समुद्राकडे तोंड करून दोन तोफा आहेत. किल्ल्याच्या दक्षिण बाजूस जहाजाची गोदी होती, ओहोटीच्या वेळेस ती अद्याप दिसते.

कुलाबा किल्ला ही महाराजांची अंतिम निर्मिती होती आणि त्यांच्या मृत्युच्या अगदी समीप एप्रिल, १६८० मध्ये तो बांधून पूर्ण झाला. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाने या किल्ल्याला महत्व प्राप्त झाले आणि मराठा आरमाराचा हा मुख्य तळ होता. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कुटुबियांसाठी महाल, त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी घरं आणि धान्य तसंच अन्य आवश्यक वस्तू साठवण्यासाठी जागा किल्ल्यावर होत्या. यापैकी एकही इमारत आता शिल्लक नाही. कुलाबकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रे यांची सत्ता १८४० मध्ये संपुष्टात आली.

किल्ल्याच्या उत्तरेस लहान किल्ल्यासारखी रचना आहे त्याला सर्जाकोट म्हणतात, काही वेळेस कुलाब्याचा १८ वा बुरुज असाही त्याचा उल्लेख करतात.