Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
विभागीय आयुक्त कोकण विभाग

विभागीय आयुक्त कोकण विभाग

कोकण विभागाचे विभागीय आयुक्त हे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या महसूल प्रशासनाचे मुख्य नियंत्रक असतात.

कोकण विभागात खालील सात जिल्ह्यांचा समावेश होतो :

१)मुंबई शहर जिल्हा
२) मुंबई उपनगर जिल्हा
३) ठाणे जिल्हा
४) पालघर जिल्हा
५) रायगड जिल्हा
६) रत्नागिरी जिल्हा
७) सिंधुदुर्ग जिल्हा

Shivaji Maharaj

हे सातही जिल्हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे जिल्हे आहेत. कोकण विभागीय आयुक्तांचे कार्यालय जुने सचिवालय, फोर्ट, मुंबई ४०००३२ आणि कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आहे. विभागीय आयुक्त कोकण हे कोकण विभागाचे महसुली प्रमुख आहेत आणि जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदांचे नियंत्रक आहेत. विभागीय आयुक्त हे नगरपालिका प्रशासनाचे प्रादेशिक संचालकही असतात आणि त्यांचे नगरपरिषदांच्या प्रशासनावरही नियंत्रण असते. तसेच संबंधित विभागात शासनाकडून देण्यात आलेली अन्य कोणतीही जबाबदारी विभागीय आयुक्ताकडूनच पार पाडली जाते.

विकास आणि प्रशासकीय बाबींसाठी शासनाकडून नेमण्यात आलेल्या विविध विभागस्तरीय समित्यांचे विभागीय आयुक्त प्रमुख असतात. अपर आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडे विभागीय आयुक्त विविध विषय सोपवितात.

जिल्हा पातळीवरील अधिकारी

  जिल्हाधिकारी जिल्हापरिषद
जिल्हा जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी
उपविभाग उपविभागीय अधिकारी -
तहसील तहसीलदार गट विकास अधिकारी
महसूल मंडळ मंडळ अधिकारी -
सजा तलाठी -
गाव - ग्रामसेवक

विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली २३ नगरपरिषदा , १७ नगरपंचायती आणि ८ महानगर पालिका आहेत.