Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
शिवराजेश्वर मंदिर


शिवराजेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग)

shivrajeshwar temple

शिवराजेश्वर मंदिर:

छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम यांनी त्यांच्या कार्यकाळात हे मंदिर बांधले. मंदिरात छत्रपती शिवाजी राजांची नाविकाच्या वेषातील मुर्ती आहे. निसर्गाचा चमत्कार म्हाणजे चहुबाजुंनी समुद्राने वेढलेले असतानाही किल्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत. सिंधुदुर्ग आणि किनारा यांच्या्मध्ये एका खडकाच्या बेटावर पद्मगड नावाचा एक किल्ला आहे.

सिंधुदुर्ग किल्याला ३ किमीची तटबंदी आहे. ती सुमारे १० मीटर उंच आणि २ ते ४ मीटर रुंद आहे. प्रवेशद्वाराची बांधणी अनाकलनीय आहे. ते मराठा किल्लेबांधणीचे वैशिष्ट्यं आहे. शत्रुचे लक्ष विचलीत करण्याणसाठी अशा प्रकारचे प्रवेशद्वार बांधण्यात येत असत. हे तंत्र इतके उत्कृष्ट आहे की, वळणांमुळे शत्रुला प्रवेशद्वार नेमके कुठे आहे, ते कळतच नाही. वळणांवळणांची तटबंदीही अशा तऱ्हेने बांधली आहे की, किल्यातील सैन्याला कुठुनही शत्रुसैन्य दिसावे आणि त्याच्यावर तोफा डागून त्यााला बेजार करता यावे.

किल्यात कसे जाल :

मालवणच्या किनाऱ्यावरून किल्यावर पोहोचता येते.

काय पाहाल :

चुनखडी दगडाच्याा लादीवर शिवरायांचे पाउल आणि हाताचे ठसे येथे संवर्धित करून ठेवण्यात आले आहेत. तसेच किल्यातील भवानीमाता, शंभुमहादेव, जरीमरी, महापुरुष ही मंदिरे पाहण्यासारखी आहेत. ती सुस्थितीतही आहेत.