Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
माथेरान हिल स्टेशन

माथेरान हिल स्टेशन

matheran Hill Station

माथेरान हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पश्चिम घाटांच्या रांगेत समुद्र सपाटीपासून २,६२५ फूट उंचीवर ते वसले आहे. माथेरानमध्ये अंदाजे ३८ ठिकाणे आहेत जिथून आसपासचे डोंगर आणि दऱ्यांचे सुंदर दृश्य दिसते. माथेरानमध्ये घनदाट जंगलाचे आच्छादन आहे. इथले काही लोकप्रिय पॉईंट्स म्हणजे वन ट्री हिल पॉईंट, द लुईझा पॉईंट, हार्ट पॉईंट, मंकी पॉईंट, रामबाग पॉईंट, इ.

माथेरान मुंबईपासून अंदाजे १०० किमी वर, पुण्यापासून १२० किमी तर सुरतपासून ३२० किमी वर आहे. नजिकचे रेल्वे स्थानक नेरळ आहे, जे माथेरानपासून अंदाजे ११ किमी वर आहे. एकतर आपण भाड्याने टॅक्सी किंवा घोडा घेऊ शकता किंवा नेरळपासून चालत माथेरान गाठू शकता.

माथेरानला कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

माथेरानमध्ये मोटर वाहन आणण्यास मनाई आहे. पर्यटक सामान्यतः मुंबईहून किंवा पुण्याहून रेल्वेने नेरळला येतात. तुम्ही तुमची कार दस्तुरी कार पॉईंटपर्यंत आणून शकता. किंवा कर्जत किंवा नेरळ रेल्वे स्थानकांपासून दस्तुरीपर्यंत अलिकडे सुरू केलेली मिनी बस शटल घेऊ शकता. दस्तुरीवरून आपण ४० मिनिटांची घोडेस्वारी किंवा हातरिक्शा घेऊन मातीच्या रस्त्याने माथेरानला जाऊ शकता.

मुंबई ते माथेरान अंतर १०० किमी
पुणे ते माथेरान अंतर १२० किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक : नेरळ

नेरळपासून, आपण विशेष नॅरो गेज टॉय ट्रेन घेऊ शकता.