Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
कान्हेरी गुंफा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

कान्हेरी गुंफा

kanheri cave

कान्हेरी गुंफा या अन्य कोणत्याही गुंफांपेक्षा पोहोचण्यास सोप्या आहेत आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अगदी मध्यावर आहेत. १०९ गुंफांपर्यंत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पोहोचता येतं आणि या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला रस्ताही आहे. ही जागा अत्यंत सुरेख आहे. आजुबाजुला हिरवळ आणि गुंफांमधील सुरेख कारागिरी तर आहेच, परंतु त्याबरोबरच हा एकेकाळचा व्यापारी मार्ग होता आणि येथे बौद्ध धर्मिय विद्यापीठ होते हे ऐकून तर अधिकच थक्क व्हायला होत. यापैकी बहुतांश गुंफा या मठासारख्या आहेत. त्याचा वापर राहण्यासाठी, तसेच अभ्यास आणि ध्यानासाठी करण्यात येत होता. गुंफांमध्ये कोरीवकाम केलेली शिल्पे, खांब आणि पुजेसाठी स्तुप आदी गोष्टी आहेत.

बौद्धधर्मियांची ही तीर्थयात्रा बोरिवली रेल्वे स्थाानकावरून काही अंतरावरच संपते, परंतु बहुतेक जणांसाठी ही आणखी एका प्रवासाची सुरुवात असते. हा प्रवास आध्यात्मिक आणि सखोल धार्मिक असतो.

ठिकाण : कान्हेरी गुंफा मुंबईपासून ४० कि.मी. आणि बोरिवली स्थानकापासून १० किमी अंतरावर असून त्यां संजय गांधी राष्ट्रीय उदयानाच्या मध्यावर आहेत.

आकर्षण : गुंफा या नेहमीच सुंदर असतात. परंतु, उंचावरील एका गुंफेत कोरण्यात आलेल्या शिल्पात अत्यंत रमणीय असा कलाविष्कार आहे. यात देवी तारा आणि देवी भृक्ती आहेत आणि मध्य‍वर्ती ठिकाणी अवलोकीतेश्वर, तसेच उजवी आणि डावीकडे पाच बोधचिन्ह कोरण्यात आली आहेत.

प्रामुख्याने बौद्ध भिख्खू आणि येथून जाणारे व्यापारी या गुंफा इसवी सन पूर्व १ ते इसवी सनाच्या ९ व्या शतकापर्यंत वापरत होते. परंतु, इसवी सनाच्या ४ थ्या-५व्या शतकात कोरण्यात आलेली चैत्य गुंफा पर्यटकांचे लक्ष वेधून घेते, याच्या छताला केलेले लाकडी बांधकाम आजही सुस्थितीत आहे.

गुंफांच्या बाहेरच्या बाजुला भगवान बुद्धांचे विशेषत: अवलोकितेश्वुराच्या अवतारातले अनेक पुतळे कोरण्याात आले आहेत. येथील कलाकृतींमध्येी अनेक भेद आहेत. बहुधा वेगवेगळ्या काळात त्या कोरल्या गेल्यामुळे असावे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

lion Panther Dearers

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरिवली राष्ट्रीय उद्यान या नावानेही ओळखले जाते. ते मुंबईचे उपनगर असलेल्या बोरिवली ये‍थे आहे. व्याघ्र आणि सिंह सफारी हे येथील मुख्य आकर्षण आहे. सिंह सफारी हे येथील प्रमुख आकर्षणांपैकी एक असून ते सुरू झाल्या पासून अनेक लोक उद्यानाकडे आकर्षित झाले. १२ हेक्टारच्या सिंह सफारी उद्यानात वाकड्या तिकड्या रस्त्यावर विशेष बसने फिरताना बऱ्याचदा जंगलाच्या राजाचे दर्शन होते.

सिंह सफारी १२ हेक्टरच्या भागात आणि व्याघ्र सफारी २० हेक्टर परिसरात केली जाते. येथील घनदाट अरण्यात साग, बांबू, ऐन, खैर, कुसुम आणि अन्य वृक्ष आहेत. हा भाग विकसित करताना वाघांची नैसर्गिक वस्तीस्थाने विचारात घेउून येथे उंच गवत, तलाव, बेटे आदी गोष्टीही तयार करण्यात आल्या आहेत. ५ मीटर उंच आणि २,२०० मीटर लांब संरक्षणात्मक जाळीने हा भाग वेढलेला आहे. वाघांना खाण्यासाठी आणि झोपण्यासाठी विशेष पिंजरे बनविण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दोन निरीक्षण मनोरे तयार करण्यात आले आहेत.

येथून जवळचे विमानतळ सांताक्रुझ आहे, देशांतर्गत हवाई वाहतूक करणाऱ्यांसाठी ते १६ किमी अंतरावर आहे, जवळचे रेल्वे स्थानक मुंबईत ४० किमी अंतरावर आहे.

अभयारण्यास भेट देण्याची वेळ: सकाळी ९ ते सायं. ५.३०
सफारीच्या वेळा: सकाळचे सत्र ९ ते १
सायंकाळचे सत्र: २.२० ते ५.२०