‘पॅलेस ऑन व्हील’च्या संकल्पनेवर आधारित डेक्कन ओडिसी ही विशेष आरामदायी ट्रेन आहे.
ही भारतीय रेल्वे च्या कोकण मार्गावरील पर्यटनाला चालना देण्याासाठी सुरू करण्यात आली
आहे. या गाडीची मार्गक्रमणा मुंबईतून सुरू होते. ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव,
कोल्हापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अजिंठा-वेरूळ या ठिकाणी जाऊन पुन्हा मुंबईत येते.
महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचे रेल्वेमंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम
राबविला जातो. या ट्रेनमधे पंचतारांकीत हॉटेलमधील सुविधा देण्यात येतात. दोन रेस्टॉरन्ट
आणि बार, बिझनेस सेंटर अशा अनेक सुविधा प्रवाशांना देण्यात येतात. विशेष सुविधा असलेले
या ट्रेनचे डब्बे चेन्नईच्या कारखान्यात तयार करण्यात आले आहेत.
अपूऱ्या प्रतिसादामुळे २००४ साली महाराष्ट्रं शासनाने ही गाडी काही काळ बंद केली होती.
परंतु पावसाळ्यानंतर ती लगेच सुरू करण्यात आली.
या गाडीतून पर्यटनाचा कालावधी ७ दिवसांचा आहे, दर बुधवारी ही ट्रेन मुंबईतून सुटते.
|