Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
धार्मिक स्थळे

 
श्रीसिद्धिविनायक मंदिर

श्री सिद्धिविनायक  मंदिर :

श्री सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील अत्यंत प्रसिध्द देवस्थान आहे. या मंदिराची मूळ स्थापना श्रीमती देऊबाई पाटील यांनी आणि बांधकाम श्री. लक्ष्मण विठू यांनी १८०१ साली केले होते. सध्या ज्या गाभाऱ्यात गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे, त्याचे छत सोन्याने मढविण्यात आले आहे. या गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजांमध्ये अष्टविनायक कोरण्यात आले आहेत. सिद्धिविनायक मंदिराजवळच एक हनुमानाचेही मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिरातील गणपती हा नवसाला पावणारा गणपती मानला जातो. मंदिराच्या अधिकृत संकेत स्थळावर वेबकॅमेऱ्याद्वारे मंदिरातील सर्व पूजाविधी घरबसल्या पाहता येतात. पूजेसाठी ऑनलाइन नोंदणीही करता येते.


Mumbai Mahalaxmi

महालक्ष्मी मंदिर :

धन आणि संपत्तीची देवता असणाऱ्या महालक्ष्मी देवीचे हे मंदिर आहे. महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. हे मंदिर येथील नवरात्रोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या काळात मोठ्या संख्येने भाविक येथे येतात आणि त्यासाठी महापालिका विशेष व्यवस्थाही करते. दिवाळीतही अनेक भक्त महालक्ष्मी मंदिराला भेट देतात. अरबी समुद्रातून वर दिसणाऱ्या लहानशा टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिराच्या गच्चीतून दिसणारे दृश्य आणि समुद्रावरून येणारी वाऱ्याची झुळूक येथील भेट अविस्मरणीय ठरविते.


Mumbadevi temple

मुंबादेवी मंदिर :

हे मंदिर सहा शतके जुने आहे. आधीचे मुंबादेवी मंदिर बोरीबंदर येथे होते. ते १७३९ ते १७७० दरम्यादनच्या काळात पडले. त्यानंतर त्याच ठिकाणी भुलेश्वर येथे नवीन मंदिर बांधण्यात आले. भूमातेचे मानवी रुप धारण केलेली देवता म्हणून मुंबादेवीकडे पाहिले जाते.


Swaminarayan Temple

श्री स्वा‍मीनारायण मंदिर :

दादर येथील श्रीस्वामीनारायण मंदिरांत श्रीकृष्ण, राधा, हरिकृष्ण महाराज आणि घनश्याम महाराज यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर तीन सुंदर मनोऱ्यांचे आणि गुलाबी दगडांनी पारंपरिक भारतीय बांधकामशैलीत घडविलेले आहे. मंदिराभोवती गुंतागुंतीचे कोरीवकाम असलेल शिल्प बनविण्यांत आले आहेत.

दादर येथील श्रीस्वामीनारायण मंदिराची कोनशिला १९७९ साली रोवण्यात आली. मंदिर गुलाबी दगडात बांधण्यात आले आहे.


Hali Ali Dargah

हाजी अली दर्गा :

हाजी अली दर्गा हा दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात आहे. हा दर्गा इंडो-इस्लामिक स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. दर्ग्यामध्यें सय्यद पीर हाजी अली शहा बुखारी यांची कबर असून तो १४३१ साली बांधण्यात आला आहे. दर्ग्याला रोज हजारो स्थानिक आणि पर्यटक भेट देतात. काही वेळा शुक्रवारी विविध मुस्लिम कलाकार येथे कव्वाली सादर करतात.