Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
धार्मिक स्थळे

Mount Mary church

माउंट मेरी चर्च :

हे रोमन कॅथलिक चर्च असून ते मुंबईतील वांद्रे इथे आहे. कुमारिका मेरीचा जन्मोत्सव येथे ८ सप्टेंबर नंतरच्या पहिल्यात रविवारी साजरा केला जातो. या उत्सवानंतर येथे आठवडाभर जत्रा असते त्यालाच वांद्र्याची जत्रा म्हणतात. या जत्रेला हजारो लोक उपस्थिती लावतात. मुंबईतल्या ख्रिस्ती लोकांसाठी हे स्थळ खूप पवित्र आहे.


Iskon emple

इस्कॉन मंदिर :

दगडी मंदिराव्यतिरिक्त जूहू येथील इस्कॉन मंदिरात वैदिक शिक्षण, ग्रंथालय, गोविंदा रेस्टॉरंन्ट, वैदिक संस्कार हॉल, अतिथी गृह आणि दुकानेही आहेत. इस्कॉन चळवळीचे संस्थापक ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी १९७२ साली या मंदिराची कोनशीला रोवली. हे मंदिर सर्वसामान्यांसाठी १९७८ मध्यें खुले झाले. लाइव्ह दर्शन मंदिराच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इस्कॉन जूहू मंदिरापासून जवळच पश्चिम रेल्वेचे स्थानक अंधेरी (२.७ किमी) आणि विलेपार्ले (२.९ किमी) आहे.

 

Global Vipassana Pagoda

जागतिक विपश्यना पॅगोडा :

अत्यंत शांत ठिकाण आणि येथील परिसरात चांगले वातावरण ठेवण्यात आले आहे. मुंबई शहरापासून हे काहीसे दूर गोराई येथे आहे. कोणत्याही खांबाविना हे बांधकाम उभे करण्यागत आले आहे. येथील सभागृहात पॅगोडा कसा बांधण्यात आला याची चित्रफित पाहता येते. येथे ध्यान करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा. भेट द्यायलाच हवे असे हे ठिकाण आहे.

 

Essel World

एस्सेल वर्ल्ड :

हे सुप्रसिद्ध मनोरंजन उद्यान आहे. इथे मोठया रोलर कोस्टर राइड्स आहेत. हे ठिकाण बोरिवलीच्या अगदी एका टोकाला आहे. लहान मुले आणि माणसांसाठी खूप वेगवेगळ्या राइड्स असणारे हे मुंबईतील एक खूप मोठे उद्यान आहे. हे मनोरंजनाचे विश्व आहे आणि येथे प्रथमोपचार, पिण्याचे पाणी, दूरध्वनी आणि खानपान सेवा, तसेच वृद्ध-अपंगांना प्रवासी सामान ठेवण्यासाठीची सोय आदी प्रा‍थमिक गोष्टी उपलब्ध आहेत.