महालक्ष्मी मंदिर, डहाणू :
डहाणूत दोन महालक्ष्मी मंदिरे आहेत. एक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ जवळ चारोटी नाका
येथे आहे आणि दुसरे महालक्ष्मी टेकडी नावाच्या् डोंगरावर वसलेले आहे. महालक्ष्मी ही
आदिवासींची कुलदेवता आहे. त्यामुळे सणांच्या काळात आदिवासी बांधव येथे तारफा नृत्य
करतात. दरवर्षी हनुमान जयंतीपासून पुढे १५ दिवस येथे जत्रा असते, त्याला महालक्ष्मी
यात्रा असे म्हेणतात.
|