Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
रायगड किल्ला

रायगड किल्ला

raigad

रायगड किल्ला हा एक डोंगरी किल्ला असून महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये तो आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून २,७०० फूट उंचीवर आहे. या किल्ल्यावर जायला अंदाजे १४००-१४५० पायऱ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये हा किल्ला आपली राजधानी केली. या किल्ल्यात गंगासागर तलाव कृत्रिमरित्या तयार करण्यात आला आहे. मुख्य बाजारपेठेच्या अवशेषांच्या सन्मुख छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या मार्गावरून जगदीश्वर मंदीर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जाता येतं.

रायगड किल्ल्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

नजिकचे बस स्थानकः महाड

मुंबई ते रायगड किल्लाः मुंबई –पनवेल (मुंबई-गोवा महामार्ग) – महाड – रायगड किल्ला

पुणे ते रायगड किल्लाः: पुणे-पौड रोड-दावडी-भिरा टोप-आदरवाडी-निझामपूर-माणगावमार्गे मुंबई-गोवा महामार्ग-महाड-रायगड किल्ला

मुंबई ते रायगड किल्ला अंतर १६० किमी
पुणे ते रायगड किल्ला अंतर १७० किमी

साहसी उपक्रम

ट्रेकींग

रायगड किल्ला स्थलदर्शन

शिवथर घळ

Shivthar Ghal

शिवथर घळ हे ठिकाण हिरवी गर्द झाडी, डोंगर, एक मोठा धबधबा आणि नदी यांनी वेढलेले आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे एक सुप्रसिद्ध संत समर्थ रामदास यांनी दासबोध या ग्रंथाची रचना केली.