Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
रत्नागिरी पर्यटक आकर्षणे

रत्नागिरी पर्यटक आकर्षणे

मत्स्यालय

Aquarium

रत्नागिरीमधील हे एक लहान मत्स्यालय आहे जे रत्नदुर्ग किल्ल्याच्या वाटेवर आहे. व्हेल माशाचा प्रचंड डोक्याचा भाग हे इथलं मुख्य आकर्षण आहे. आकर्षक मासे आणि कासवांच्या विविध प्रजातींचे नमुने इथल्या टाक्यांमध्ये पाहायला मिळतात.


आरेवारे किनारा

Arevare

आरेवारे हा एक सुरक्षित आणि निळ्या पाण्याचा किनारा आहे. तो गणपती पुळ्यापासून जवळ आहे. आरेवारे इथला रस्ता उंच डोंगराच्या कडेने जातो, आणि खालच्या बाजूस समुद्राच्या लाटा सतत फेसाळताना दिसतात. इथून सूर्यास्त अप्रतिम दिसतो.


लोकमान्य टिळक स्मारक

tilak-smarak

रत्नागिरी हे भारताचे एक महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांचे जन्म स्थान आहे. त्यांचे घर आता एक स्मारक म्हणून जतन केले आहे आणि त्याला लोकमान्य टिळक स्मारक असे म्हणतात. स्थानिकांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने जपून ठेवले आहे.


मांडवी किनारा

mandavi-beach

मांडवी किनारा एक अत्यंत सुंदर आणि सर्वाधिक गर्दी होणारा रत्नागिरीतील किनारा आहे. मांडवी किनाऱ्यावर चमकदार काळी वाळू आहे म्हणून त्याला काळा समुद्र म्हणतात.


थिबा पॅलेस

thiba-palace

थिबा पॅलेस १९१०-११ मध्ये बांधण्यात आला. हा किल्ला रत्नागिरी खाडीच्यावर आहे. इथल्या संग्रहालयात ६ व्या शतकातले पुतळे जतन केले आहेत.


थिबा पॉईंट

thiba-point

थिबा पॉईंट इथून भाटे खाडी आणि जवळपासच्या ठिकाणांचं सुंदर दृश्य दिसते. थिबा राजा याठिकाणी बसून आपल्या मायदेशाची आठवण करत समुद्र पाहात असायचा. इथून उत्कृष्ट सूर्यास्त दिसतो. थिबा पॉईंटवरून शहराचं विहंगम दृश्य दिसते.


भाट्ये किनारा

bhate-beach

भाट्ये किनारा भाट्ये खाडीच्या जवळ आहे. याला स्थानिक लोक सुरूबन म्हणतात. हा सुंदर किनारा १.५ किमी लांबीचा आहे. किनाऱ्याच्या टोकास झरी गणपतीचं सुप्रसिद्ध मंदीर आहे.


जयगड किल्ला

jaigad-fort

जयगड किल्ला रत्नागिरीच्या उत्तरेकडे द्वीपकल्पाच्या टोकावर वसलेला आहे. जयगड किल्ला खाडीच्या किनारी एका उंच टेकडीवर आहे. १७ व्या शतकातील हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. इथे मोहमायादेवी आणि भगवान गणेशाचे मंदीर आहे. इथे एक लाईटहाऊस देखील आहे जिथून अरबी समुद्र आणि जयगड खाडीचं सुंदर दृश्य दिसते.


पूर्णगड किल्ला

purngad-fort

हा किल्ला पूर्णगड गावाच्या अगदी जवळ आहे. मुचकुंदी नदीच्या खाडीच्या जवळ तो वसलेला आहे. त्याच्या भोवती अरबी समुद्र आहे. नदी आणि अऱबी समुद्र यांचा संगम पूर्णगड किल्ल्यावरून दिसतो, हे दृश्य अतिशय सुंदर दिसते. किल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वारावर, चंद्र, सूर्य आणि भगवान गणेश यांची चित्रे कोरलेली आहेत.


रत्नागिरीला कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई ते रत्नागिरी : पनवेल – पेण – महाड – खेड – चिपळूण – संगमेश्वर – रत्नागिरी (एनएच १७)

पुणे ते रत्नागिरी : सातारा – पाटण – कोयना नगर – चिपळूण – संगमेश्वर – रत्नागिरी

मुंबई ते रत्नागिरी अंतर ३४० कमी
पुणे ते रत्नागिरी अंतर २९० किमी
गोवा ते रत्नागिरी अंतर २५६ किमी
चिपळूण ते रत्नागिरी अंतर १०६ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानकः रत्नागिरी