Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
श्रीवर्धन किनारा

श्रीवर्धन किनारा

shrivardhan Beach

हा एक छान आणि स्वच्छ किनारा आहे. या किनाऱ्यावर प्रदूषणरहित हवा आणि सुंदर निळा समुद्र असं वातावरण आहे. पुण्यापासून जवळ असलेले व एकमेकांपासून अंदाजे १५ किमीच्या अंतरावर तीन उत्तम किनारे आहेत – श्रीवर्धन – हरिहरेश्वर – दिवेआगर. हा किनारा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किनाऱ्यांपैकी एक आहे.

श्रीवर्धन किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून सहजपणे जाता येते. श्रीवर्धन किनाऱ्यावर बोटींग, सेलींग, पोहणे, बिच व्हॉली बॉल आणि बिच वॉकींग हे असे उपक्रम आहेत.

श्रीवर्धन किनाऱ्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई – पनवेल – पेण – कोलाड – माणगाव – म्हसळा – श्रीवर्धन.

पुणे – ताम्हिणी – कोलाड – इंदापूर – माणगाव – म्हसळा – श्रीवर्धन.

मुंबई ते श्रीवर्धन अंतर १८५ किमी
पुणे ते श्रीवर्धन अंतर १६५ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक माणगाव आहे, जे श्रीवर्धनपासून ४५ किमी अंतरावर आहे.

श्रीवर्धन किनारा स्थलदर्शन