Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
सिंधुदुर्ग पर्यटक आकर्षण

No image

धामापूर तलाव :

धामापूरच्या भगवती मंदिरासोबत एकदा उल्लेख केलेला असताना धामापूर तलावाचा पुन्हा वेगळा उल्लेख केल्याने पर्यटक वाचकांना कदाचित नवल वाटेल. परंतु, हा तलाव विशेष उल्लेखास पात्र असा अव्दितिय तलाव आहे. हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे.

हा मानव निर्मित तलाव १५३० साली राजा नागेश देसाई याने बांधला असून त्याच्या दोन्ही बाजुंना सुंदर पर्वतरांगा आहेत. यातील पाणी अगदी नितळ असून शेजारी आंबे, नारळ, पोफळीची दाट झाडे आहेत. ही कोकण भागातील प्रसिद्ध फळझाडे आहेत. जंगल आणि बागायतीने वेढलेला असल्यामुळे हा तलाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर तलाव झाला आहे. एकदा या ठिकाणी आल्यावर पर्यटकांना वातावरणात झालेला बदल सहज जाणवू शकेल. या भागात जैवविविधताही भरपूर आहे.


No image

शिरोडा  मिठागर :

हे ठिकाण वेंगुर्ल्या्पासून १७ किमी अंतरावर असून येथे नारळाची आणि सुरूची विपूल झाडे, तसेच सुंदर समुद्रकिनारा आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेले गोवा येथून केवळ ७ किमी अंतरावर आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्याशी शिरोड्याचे सुंदर साहित्यिक नाते आहे. ते येथे हायस्कूोल शिक्षक म्हणून काम करायचे. ते येथे खूप काळ राहिले आणि या ऐतिहासिक गावातच त्यांनी त्यांचे बहुतांश साहित्यनिर्मिती केली.

शिरोड्यामध्ये मिठागरेही पाहायला मिळतात.


No image

चित्रालीची लाकडी खेळणी :

लाकडी खेळणी आणि हस्तकलेच्या वस्तु ही सावंतवाडीची विशेषता आहे. या वस्तु जगभर प्रसिद्ध आहेत. त्याला भारतभरातून आणि भारताबाहेरूनही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. येथील खेळणी आणि हस्तकलेच्या वस्तु दर्जाबाबत अप्रतिम असतात, यात काही शंकाच नाही.


No image

आत्मेश्वर ताळी :

सावंतवाडी शहरात अनेक आकर्षक ठिकाणे आहेत. त्यापैकी आत्मेश्वर ताळी हेही एक अप्रतिम ठिकाण आहे. प्रत्येक ठिकाणाच्या काही आख्यायिका असतात. या ठिकाणाबद्दल सांगितले जाते की, एका विद्वान स्वामीजींनी जय माते भागीरथीचा मंत्र जपून येथे त्रिशूळ फेकला. आणि त्या‍मुळे जमिनीतून पाणी पाझरले, ते आजपर्यंत वाहते आहे. बदलत्याा काळानुसार जलद आणि अनियोजित आधुनिकीकरणाचा फटका याही भागाला बसला आहे.


No image

गंजिफा पत्ते, सावंतवाडी:

हातांनी बनविलेल्यात या कागदी पत्यावर दशावताराच्या नक्षी रंगविलेल्या असतात. प्रत्येक पाकिटामध्‍ये १२० पत्ते असतात आणि ते रंगीत खोक्यात घातलेले असतात.
इतिहास सांगतो की हे पत्ते सावंतवाडीत ३५० वर्षांपूर्वी आले. भोसले राजघराणे येथे स्थिरावले. भोसल्यांनी त्यांच्या सोबत लाकडावर कलाकुसर करणारे अनेक कारागीर आणले होते. ही कुटुंबे प्रामुख्याने राजघराण्‍याला हस्तेकलेच्या वस्तु देऊनच आपला गुजराण करीत असे. १९८१ मध्ये अशी एकूण ४५ कुटुंबे तेथे होती. त्यापैकी ६ कुटुंबे आजही सावंतवाडीत आहेत. या कुटुंबांनीच हा खेळ तयार केला.


No image

मोऱ्याचा धोंडा मालवण:

मालवण शहरात दांडी नावाचा भाग आहे. येथे समुद्रकिनारी एक शिळा आहे. या शिळेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारागीरांनी गणपती, शिवलिंग, नंदी, चंद्र आणि सुर्याच्या प्रतिमा कोरल्याा आहेत. त्याच्यां पूजेचा समारंभही त्याकाळी झाला होता.