तारकर्ली येथे नदीच्या काठावरील संथ पाण्याचे निसर्गरम्य सौंदर्य हे कल्पनाशक्तीच्या
पलिकडील आहे. सुंदर व्हर्जिन किनारे समृद्ध हिरव्या झाडांनी वेढले गेले आहेत. ताजी
थंड हवा तुमच्या अवती भवति वाहत असते. प्रत्येक क्षण तुम्हाला तुमच्या चिंता विसरून
जाण्यास मदत करेल आणि तुम्ही तुमच्या जीवनाला वेळ द्याल.
तारकर्ली आणि कुडाळ यांच्या दरम्यान असलेल्या कर्ली नदीच्या काठावरील संथ पाणी हे महाराष्ट्रातील
सुट्टीतील स्टार आकर्षण आहे. २००३ साली एमटीडीसीने केरळ हाउसबोट सारख्या हाउसबोट सुरु
केल्या आणि त्यामुळे तारकर्ली पर्यटनात सोन्याची पिसे जोडली गेली आहेत. कर्ली नदीतील
हाउसबोट प्रवास हे आता अव्दितिय आकर्षण बनले आहे. तारकर्ली मध्ये आता हाउसबोट सुरु
झाल्यामुळे पर्यटक केरळ सारखे रात्रभर हाउसबोटचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही बोट भाड्याने
घेऊन देवबागपासून कर्ली नदीत समुद्रपर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
बोट सुरू झाल्यावर, हाताचे तळवे नदीच्या आतपर्यंत दोन्ही बाजूंच्या दिशांनी हलवून आनंद
लुटू शकता. तारकर्ली समुद्रकिनारा याला स्वच्छ पाण्याचा आशीर्वाद लाभल्यामुळे तारकर्ली
हि स्कुबा डायविंग साठी एक उत्तम जागा आहे. तारकर्ली मध्ये सिंधुदुर्ग किल्ला परिसर
हे स्कुबा डायविंग साठी एक प्रमुख जागा आहे.
|