Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
ठाण्यातील उद्योग

ठाण्यातील उद्योग

Thane Industrial

ठाणे हा महाराष्ट्रातील औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असलेला जिल्हा आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी हे औद्योगिकदृष्ट्या विकसित आणि शहरीकरण झालेले भाग आहेत. जिल्ह्यात १० एमआयडीसी, २ सहकारी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यातील प्रमुख उद्योग हे रसायनिक, ऑटोमोबाइल, औषधनिर्मिती, कृत्रिम धागेनिर्मिती, प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या वस्तू निर्मिती, खते, जंतूनाशके, रंग, खाद्य पदार्थ निर्मिती आदी आहेत.

ठाणे – बेलापूर – कल्याण हा औद्योगिक पट्टा अत्याधुनिक उद्योगांचा आहे. जिल्ह्याची औद्योगिक वाढ या पट्ट्यातच केंद्रीत झाली आहे. जिल्ह्याचे विभाजन तीन विभागांत करता येईल. पहिला विभाग जो थेट मुंबई महानगराच्या प्रभावाखाली आहे. हा भाग बहुतांश उपनगरासारखा आहे, तो म्हणजे ठाणे, कल्यााण आणि उल्हागसनगर तालुक्याचा भाग. येथे अनेक आधुनिक आणि

संघटित उद्योग केंद्रीत झाले आहेत. दुसऱ्या भागात औद्योगिकदृष्ट्या विकसित होणाऱ्या अंबरनाथ आणि भिवंडी या भागाचा समावेश होतो. तिसऱ्या भागात उर्वरित विभागाचा समावेश होतो. त्यात काही ग्रामोद्योग, लहानसहान उद्योग आणि प्राथमिक कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत.

जिल्ह्याचा एकूण भौगोलिक भाग ९३४ हजार हेक्टरचा आहे. अर्थात राज्यााचा ३.११ टक्के भाग या जिल्ह्याने व्यापला आहे. जिल्ह्यात ठाणे, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि उल्हासनगर असे सात तालुके आहेत.

औद्योगिक वसाहती/भाग:

ठाणे जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या विकसीत जिल्हा आहे. हा जिल्हा मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या शहरा शेजारी आहे, तसेच पायाभूत सुविधा, वीज, पाणी, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग, लोहमार्ग आदी सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.