Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
धार्मिक स्थळे

ठाण्यातील धार्मिक स्थळे

 
Haji Malang Baba

हाजी मलंग बाबा :

हाजी मलंग हा ३०० वर्षे जुना दर्गा अंबरनाथ तालुक्यात आहे. या ठिकाणी बाबा अब्दुर रेहमान मलंग यांची कबर आहे. मलंग हे सुफी संत होते ते १२ व्या शतकात मध्यपूर्वेतून भारतात आले होते. हाजी मलंग येथे खऱ्या अर्थाने सांस्कृंतिक सरमिसळ पाहायला मिळते. हा काही मोजक्या दर्ग्यां पैकी आहे, जिथे हिंदू वहिवाटदार आणि मुस्लिम मुतवल्ली दोघेही पूजा विधी करतात. कारांडेकर हे हिंदू कुटुंब येथील परंपरागत पुजारी आहे आणि मुलावल्लीत हे या संताशी नाते सांगणारे मौलवीही येथे आहेत.

हजरत क्वामली शहा बाबांचा दर्गाही ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील हाजी मलंग दर्ग्या पासून जवळच आहे.


 
Kopineshwar Temple

कोपिनेश्वर मंदिर :

हे भगवान शिवाचे पुरातन मंदिर आहे. येथील शिवलिंग पाच फूट उंच आहे. या शिवलिंगाची उंची दरवर्षी वाढत असते आणि असे मानले जाते की, ठाण्यावर इसवी सन ८१० ते १२४० या काळात राज्य करणाऱ्या शिलाहार राजांनी हे मंदिर बांधले आहे. शिवलिंग स्वयंभू असून ते मासूंदा तलाव किंवा ज्याला तलावपाळी असेही म्हंणतात त्याच्या जवळ आहे. सध्याचे मंदिर १७६० साली सरसुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी नव्यांने बांधलेले आहे. त्याचबरोबर ठाण्यात रुक्मिणी-विठ्ठल, शितला देवी, पंचमुख शिवलिंग, ब्रह्मदेव, उत्त्रेश्वर, राम परिवार, दक्षिणमुख हनुमान, कालिकादेवी, गायत्री देवी, काळभैरव, दत्तात्रेय, कामधेनुसोबत वशिष्ठ महर्षी अशी अनेक मंदिरे आहेत.


Ganeshpuri Temple

गणेशपुरी मंदिर :

हे भिवंडीजवळचे लहानसे गाव आहे. हे ठाण्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असून स्वामी नित्यानंद महाराजांचे ते वास्त्व्याचे ठिकाण होते. चार कुंड आणि प्राचीन मंदिरही येथे आहे. हे कुंड ८०० वर्षांपूर्वीचे आहेत. त्यातील गरम पाण्यासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. वशिष्ठ मुनी यांनी गणेशाच्या शांतीसाठी येथे यज्ञ केला होता, म्हणून या जागेला गणेशपुरी नाव पडल्याची आख्यायिका आहे. परंतु, भगवान नित्यानंद यांनी ह्या ठिकाणी काही आदिवासींची वस्ती असलेल्या घनदाट अरण्यापासून बदलून आत्मबोधाची इच्छाा असणाऱ्यांसाठीचे आधात्मिक केंद्र बनविले. भगवान यांचे शिष्य बाबा मुक्तानंद यांनी येथे स्थापन केलेले गुरुदेव सिद्धपीठ हे परदेशी पर्यटक येथे येण्याचे एक प्रमुख कारण आहे. श्रीगुरुदेव आश्रम किंवा गुरुदेव सिद्धपीठ हे तब्बल ७५ एकर भूखंडावर पसरले आहे. ही संस्था् स्वामी नित्यानंद यांनी १९४९ मध्ये स्थापन केली. १९५६ मध्ये स्वामी मुक्तानंद तेथे कायमस्वरूपी वास्तव्याला आले आणि आश्रम वाढायला लागला. ऑगस्ट १९६१ मध्ये नित्यानंद यांनी महासमाधी घेतल्यानंतर मुक्तानंद यांनी गुरूच्या स्मृती प्रित्यर्थ आश्रमाचे नामकरण श्रीगुरुदेव आश्रम असे केले. आश्रमाच्या् भोवती आदिवासींच्याा पूनर्वसनासाठी वसाहत वसविण्यांत आली आहे. स्वामी नित्यानंदांची समाधी आणि भीमेश्वर गणेशाचे मंदिर ही दोन्ही स्थाने आश्रमापासून अगदी जवळ आहेत.


Manas Jain Temple

मानस जैन मंदिर :

मानस जैनमंदिर हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. ते वाशिंद आणि आसनगावच्या मधोमध आहे. श्रीभुवन भानु जैन मानस मंदिर तीर्थ हे महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सवरोली गावात वसविण्यात आले आहे. हे ठिकाण मुंबईपासून ८५ किमीवर, ठाण्यापासून ४५ किमीवर आणि भिवंडीपासून ३० किमी अंतरावर आहे.