वज्रेश्वरी हे स्थान तिथले मंदीर आणि गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. मुख्य
मंदीरापर्यंत जाण्यासाठी ५२ पायऱ्या आहेत. इथून मंदिराच्या भोवतालचे सुंदर दृश्य दिसते.
विशेषतः पावसाळ्यात हा देखावा पाहण्यासारखा असतो. वज्रेश्वरी इथले गरम पाण्याचे झरे
भक्तांना स्नानासाठी विशेष आहेत. या झऱ्यांमध्ये गंधकाचे प्रमाण भरपूर असल्याने त्वचेचे
अनेक रोग त्यामुळे बरे होतात असे मानतात.
|