आपत्ती व्यवस्थापन

112/100  तातडीच्या मदतीसाठी डायल करा संकेतस्थळ

आपत्कालीन परिस्थितीत या नि:शुल्क क्रमांकावरून पोलीस आणि अग्निशमन दलाशी त्वरीत संपर्क साधता येईल. संकटात सापडलेल्या महिलांसाठी तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यासाठी या क्रमांकावर तातडीची सेवा उपलब्ध आहे.

वैशिष्ट्ये
  • 1. २४ तास प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद सेवा
  • 2. व्हॉईस कॉल, एसओएस, एसएमएस, ईमेल, वेब विनंती किंवा पॅनिक बटणाचा वापर करून मदतीसाठी विनंती करा
  • 3. कॉलर/पीडित व्यक्ती जिथे असेल, त्या ठिकाणाचा स्वयंचलित मागोवा
  • 4. नजीकच्या आपत्कालीन प्रतिसाद वाहनातून तातडीने सहाय्य उपलब्ध
  • 5. आपत्कालीन प्रतिसाद वाहनांचा थेट मागोवा
  • 6. मध्यवर्ती नियंत्रण केंद्राद्वारे आपत्कालीन सेवा समन्वय
  • 7. आपत्कालीन परिस्थितीत झटपट निर्णय, परिणामी कमी वेळात प्रतिसाद शक्य

108 / रुग्णवाहिकेसाठी डायल करा वेबसाइटवर जा

या नि:शुल्क क्रमांकावर फोन करून, अत्यवस्थ रूग्णांना पुढच्या उपचारांसाठी जवळच्या रूग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी, जीवन रक्षक रूग्णवाहिका मागवता येते. रस्ते अपघात, सर्व प्रकारचे गंभीर आजार, गंभीर परिस्थिती असणाऱ्या गर्भवती महिला, नवजात बालके, साथीच्या रोगाचे अत्यवस्थ रूग्ण अशा सर्वांसाठी तसेच नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित धोक्यांमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.

वैशिष्ट्ये
  • 1. “गोल्डन अवर थिअरी” – आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यापासूनच्या पहिल्या तासात रुग्णाला जवळच्या रुग्णालयात हलवले जाईल
  • 2. रुग्णासाठी २४ तास नि:शुल्क सेवा उपलब्ध
  • 3. अद्ययावत जीवन रक्षक सहाय्य रुग्णवाहिका आणि मूलभूत जीवन रक्षक सहाय्य रुग्णवाहिका उपलब्ध
  • 4. प्रशिक्षित वाहनचालक आणि स्वत: डॉक्टर असणाऱ्या प्रशिक्षित आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकाऱ्यांनी सुसज्ज रूग्णवाहिका
  • 5. वाहनात संगणक तंत्रज्ञान, व्हॉईस लॉगर यंत्रणा, भौगोलिक माहिती यंत्रणा, भौगोलिक स्थिती यंत्रणा, स्वयंचलित वाहन मागोवा यंत्रणा आणि मोबाइल कम्युनिकेशन यंत्रणा उपलब्ध
जिल्हानिहाय रुग्णालये
क्रमांक तपशील / माहिती डाउनलोड करा
1 DDMP Mumbai City
2 DDMP Palghar
3 DDMP Ratngiri
4 DDMP Thane
5 DDMP MSD
6 DDMP Sindhudurg
7 DDMPDisaster Management Act
8 DDMP Natual Calamity