Screen Reader Access  

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग

आपली सेवा आमचे कर्तव्य

 

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सूर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला असून तो दि. २८.०४.२०१५ पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभव कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.


पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. ५०००/- पर्यंत दंड होऊ शकतो.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे

 https://aaplesarkar.mahaonline.gov.in

 

अ.क्र. वर्णन प्राणाली
1 आपले सरकार सेवा शासन निर्णय २७ मार्च २०२५ येथे क्लिक करा
2 लोकसेवा हक्क दिन साजरा करण्याबाबत (२८ एप्रिल) येथे क्लिक करा
3 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ येथे क्लिक करा
4 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नियम राजपत्र येथे क्लिक करा
5 लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांची यादी येथे क्लिक करा
6 आपले सरकार सेवा केंद्रांची यादी येथे क्लिक करा
7 आपली सेवा आमचे कर्तव्य (महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५) येथे क्लिक करा