हिल स्टेशन्स

हिल स्टेशन्स

रोजच्या धावपळीच्या दिनक्रमातून तुम्हाला थोडा बदल हवा आहे का? राज्यात थंड हवेची अनेक ठिकाणे आहेत. तुम्ही या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता आणि हवाहवासा निवांतपणा अनुभवू शकता.

माथेरान
Image of Diveagar
माथेरान

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण मुंबई पासून १०० किलोमीटर दूर असून समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर आहे. माथेरान ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ "माथ्यावरचे वन" म्हणजेच पर्वतांवर असणारे जंगल असा होतो.

ताम्हिणी
Image of Diveagar
ताम्हिणी

मुळशी - ताम्हिणी या गावांच्या दरम्यान १५ किमी क्षेत्रावर पसरलेल्या सुंदर पर्वतरांगा म्हणजेच ताम्हिणी घाट. वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती येथे पाहता येतील.

माळशेज घाट
Image of Diveagar
माळशेज घाट

तलाव, धबधबे आणि दऱ्यांच्या मधोमध वसलेला माळशेज घाट, हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या निसर्गरम्य परिसरातली भटकंती तुमचा सगळा थकवा अगदी चुटकीसरशी दूर करेल.

आंबोली
Image of Diveagar
आंबोली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये वसलेले आंबोली हे हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान आहे. मुसळधार पावसामुळे या ठिकाणी वर्षभर हिरवळ पाहायला मिळते.