धार्मिक स्थळे
धार्मिक स्थळे
महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक, वैद्यकीय पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक महाराष्ट्रात येतात.
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस
पावस हे गाव मोहक नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे आणि रत्नागिरीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या सुंदर मंदिराच्या परिसरात, ध्यानगुंफा (चिंतन कक्ष) आणि एमिलियाचे झाड आहे.
धूतपापेश्वर मंदिर
धूतपापेश्वर मंदिर
धूतपापेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे.[१][२] राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर हे गाव लागते. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.
परशुराम मंदिर
परशुराम मंदिर
भारतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या देवांची मंंदिरे आहेत. विशेषतः परमेश्वराने घेतलेल्या दहा अवताराची मंदिरे वेगवेगळ्या विशिष्ट भागात बांधलेली आहेत.विष्णूचा सहावा अवतार भार्गवराम म्हणजेच परशुरामाचे असेच एक मंदिर कोकणात आहे.
मार्लेश्वर
मार्लेश्वर
मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे.
कनकादित्य मंदिर, कशेळी
कनकादित्य मंदिर, कशेळी
श्री कनकादित्य मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे. कशेळी हे गाव रत्नागिरी शहरापासून दक्षिणेस ४० किलोमीटर, पावस पासून दक्षिणेस २४ किलोमीटर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस ३२ किलोमीटर अंतरावर कशेळी गाव वसले आहे.
दशभुजा गणपती
दशभुजा गणपती
पुण्यात दशभुज गणेशाच्या एकूण तीन मूर्ती आहेत. त्यापैकी कोथरूडची ही मूर्ती सर्वांत मोठी आहे. उत्तर पेशवाईत हरिपंत फडके यांनी हे मंदिर बांधून दुसऱ्या बाजीरावाच्या ताब्यात दिले. मंदिराची व्यवस्था देवदेवेश्वर संस्थानातर्फे पाहण्यात येते.
श्री देवी भगवती मंदिर
श्री देवी भगवती मंदिर
श्री देवी भगवती मंदिर रत्नागिरी भव्य रत्नदुर्ग किल्ल्याचा एक भाग, श्री देवी भगवती मंदिर भारतातील प्राचीन मंदिरांमध्ये गणले जाते. मंदिराच्या आत 'वीर विघ्नेश' आणि 'अष्टादश भुज' या देवतांचे अद्वितीय शिल्पकार आहेत. मंदिराला भेट देताना, अरबी समुद्राचे दृश्य चुकवू नका.
श्री देव वेतोबा मंदिर
श्री देव वेतोबा मंदिर
वेंगुर्लेपासून १२ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य अशा आरवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे. श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीत नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक, रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यान पिढ्या भाविक जनतेचे श्रद्धास्थान आहे.
श्री कनकेश्वर महादेव मंदिर
श्री कनकेश्वर महादेव मंदिर
महाराष्ट्रात, "श्री क्षेत्र कनकेश्वर" हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील कनकेश्वर येथे स्थित भगवान शिवाचे एक प्रसिद्ध आणि प्रसिद्ध "स्वयंभू" मंदिर आहे. हे मंदिर अलिबागच्या ईशान्येला ५ किमी अंतरावर एका निसर्गरम्य डोंगरावर वसलेले आहे. येथे जाण्यासाठी ७०० पायऱ्या चढाव्या लागतात.
गणपति मंदिर, रेडी
गणपति मंदिर, रेडी
रेडी का गणपति मंदिर भारत के महाराष्ट्र के छोटे से गांव रेडी में वेंगुर्ला से लगभग 30 किमी दूर स्थित है । जिस शहर में यह मंदिर स्थित है, वहां लौह अयस्क की खदानें हैं और गणपति ( गणेश ) की मूर्ति 1976 में रेवती बंदरगाह के पास एक खदान में मिली थी।
पतित पावन मंदिर
पतित पावन मंदिर
पतित पावन मंदिर हे रत्नागिरी, महाराष्ट्र येथे उभारलेले असून ते अस्पृश्यांना प्रवेश देणारे भारतातले पहिले मंदिर आहे. पतित पावन या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे समाजाकडून अव्हेरल्या गेलेल्या समाजाला स्वीकारून शुद्ध करून घेणे होय.
कोंडाणा लेणी
कोंडाणा लेणी
कोंडाणा लेणी ता.कर्जत जि. इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात हे लेणे निर्माण झाले.कोंडाणे लेण्यात एक चैत्यगृह, सात विहार आणि दोन गुहा आहेत. विहारांच्या व्हरांड्यांच्या छतांवर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात.
तुंगारेश्वर मंदिर
तुंगारेश्वर मंदिर
तुंगार पर्वतावर असलेल्या या तुंगारेश्वर मंदिरात विमलासूर राक्षसाने शिवलिंग स्थापन केले. हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे
(जिवदानी देवी)
(जिवदानी देवी)
जीवदानी देवीची पौराणिक कथा पुढीलप्रमाणे आहे: त्यांच्या जंगल प्रवासादरम्यान पांडव शूरपारकाकडे आले. त्यांनी भगवान परशुरामांनी पवित्र केलेल्या विमलेश्वराच्या पवित्र मंदिराला भेट दिली आणि वैतरणी नदीच्या काठावर थांबलेल्या प्रभासच्या प्रवासाला त्यांनी भेट दिली.
बल्लाळेश्वर (पाली)
बल्लाळेश्वर (पाली)
बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो.
वेळणेश्वर
वेळणेश्वर
वेळणेश्वर या लहानशा गावात हे वेळणेश्वर मंदीर आहे. समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ असणाऱ्या या मंदिरात सायंकाळी दिव्यांची आरास केली जाते, या रोषणाईच्या प्रकाशात मंदिराची वास्तू अतिशय आकर्षक दिसते.
हरीहरेश्वर
हरीहरेश्वर
रायगड जिल्ह्यातील हरीहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरीहरेश्वराचे हे मंदिर दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरीहरेश्वर अशा तिन्ही समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहे. एका बाजुला गर्द वनराई आणि दुसरीकडे नीळाशार अथांग समुद्र, अशी आकर्षणे पर्यंटकांना या ठिकाणाची भुरळ घालतात.
टिटवाळा गणेश मंदिर
टिटवाळा गणेश मंदिर
या प्राचीन मंदिराला भेट देणे हा सकारात्मक उर्जा देणारा अनुभव आहे.. अखंड दगडात कोरलेली गणेशमूर्ती या मंदिरात विराजमान आहे. मूर्तीबरोबरच मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना, भाविकांबरोबरच पर्यटकांच्याही आकर्षणाचे केंद्र ठरते
अंबरनाथ
अंबरनाथ
अमरनाथ या शिवशंकराच्या नावावरून ठाणे जिल्ह्यातील या शिवमंदिराला अंबरनाथ हे नाव मिळाले असावे. महाशिवरात्रीसारख्या दिवशी असंख्य भाविक या मंदिराला आवर्जून भेट देतात. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमूना असणारे हे शिवमंदिर पर्यटकांना एक वेगळा आनंद आणि समाधान देणारे आहे.
गणपतीपुळे
गणपतीपुळे
गणपतीपुळे येथील गणेशमंदिर सुप्रसिद्ध असून नयनरम्य समुद्रकिनारी ते वसले आहे. मंदिराभोवती सुमारे एक किमी अंतराचा प्रदक्षिणा मार्ग असून ही प्रदक्षिणा पूर्ण करणे हा आनंददायी अनुभव आहे.