वॉटर स्पोर्ट्स

वॉटर स्पोर्ट्स

स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे हे महाराष्ट्र राज्याचे वैभव आहे. नारळाच्या झाडांनी बहरलेले प्रसन्न समुद्र किनारे, मऊ, रेशमी वाळू, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा पाहत आणि समुद्राची गाज ऐकत निवांत वेळ घालवायचा असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रात अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.

तारकर्ली
Image of Diveagar
तारकर्ली

मालवणमधील तारकर्ली हा पर्यटकांचा सर्वात जास्त आवडता समुद्र किनारा आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. स्वच्छ समुद्र किनारा, पामची हिरवीगार झाडे आणि उत्कृष्ट चवीचे स्थानिक भोजन यामुळे तारकर्लीला पहिल्यांदाच येणाऱ्या पर्यटकांची पावले पुन्हा पुन्हा या ठिकाणाकडे हमखास वळतात.

किहीम
Image of Diveagar
किहीम

वर्षभर प्रसन्न आणि सुखद वातावरण हे किहीमचे वैशिष्ट्य. समुद्रात मोटारबाईकिंग, पॅराग्लाइडिंग, बनाना राईड असे साहसी खेळ येथे अलीकडेच खूप प्रसिद्ध झाले आहेत.

वेळास
Image of Diveagar
वेळास

थंडगार वारा, फेसाळत्या समुद्राच्या लाटा, नारळी पोफळीच्या बागा आणि सोबत कोकणी खाद्यपदार्थांची मेजवानी हे समीकरण वेळासमध्ये अगदी सहज जुळून येते. दुर्मिळ ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांमुळे वेळासला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली आहे.

हरिहरेश्वर
Image of Diveagar
हरिहरेश्वर

सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या मुखावर हरिहरेश्वर हे गाव वसले आहे. डोंगर रांगा आणि मंदिरांनी वेढलेला हा परिसर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.

वेंगुर्ला
Image of Diveagar
वेंगुर्ला

वेंगुर्ला येथील रमणीय समुद्रकिनारा हे या शहराचे वैभव आहे. इथल्या स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, स्कूबा डायव्हिंग, मासेमारी असे अनेक अनुभव घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.

शिरोडा
Image of Diveagar
शिरोडा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेपासून १७ कि.मी. अंतरावर असणारा शिरोड्याचा समुद्र हा रम्य वातावरण आणि निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्यालगतच तुम्हाला नारळी पोफळीची शेकडो झाडे दिसतील.

गुहागर
Image of Diveagar
गुहागर

प्राचीन मंदिरे, नारळी-पोफळीच्या आणि सुपारीच्या बागा, हापूस आंबे यासाठी प्रसिद्ध असलेले गुहागर हे कोकणचे वैभव आहे. शहराच्या मध्यभागी, आपल्याला १२ व्या शतकातील शिव मंदिर, व्याडेश्वर अशी प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात.

हर्णे आणि मुरुड
Image of Diveagar
हर्णे आणि मुरुड

हर्णे आणि मुरुड ही दोन टुमदार शहरे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. हर्णे समुद्रकिनारा हा मच्छीमारांसाठी मोक्याचे ठिकाण आहे तर मुरूड येथे अनेक जलतरणपटू सरावासाठी येत असतात.

डहाणू-बोर्डी
Image of Diveagar
डहाणू-बोर्डी

डहाणू-बोर्डी किनारा हे डहाणूमधील पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. समुद्र किनाऱ्याबरोबरच चिकू आणि इतर फळांच्या बागांसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

श्रीवर्धन
Image of Diveagar
श्रीवर्धन

स्वच्छ समुद्र किनारा लाभलेले श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव. या ठिकाणी तुम्हाला अनेक पेशवेकालीन वास्तू आणि मंदिरे पाहता येतील.

तारकर्ली
Image of Diveagar
तारकर्ली

निसर्गरम्य समुद्र किनारा आणि बोटींग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग अशा विविध साहसी खेळांमुळे तारकर्ली हे देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते आहे. इथल्या स्कूबा डायव्हिंग केंद्राला भेट देऊन समुद्रातील पाण्याखालच्या अद्भूत विश्वाची सफरही तुम्ही करू शकता.

दिवेआगर
Image of Diveagar
दिवेआगर

रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे ठिकाण विशेषत: थंडीच्या दिवसांत पर्यटकांनी गजबजून जाते. या किनाऱ्यावर अनेक स्थलांतरित पक्षी सुद्धा पाहायला मिळतात.