Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया

Konkan-Coast

महाराष्ट्राच्या् मुंबई शहर जिल्ह्यातील गेटवे ऑफ इंडिया ही सुप्रसिद्ध वास्तु आहे. भारतात ब्रिटिश राजवट असताना ती बांधण्यात आली आहे. ३१ मार्च १९११ रोजी या वास्तुची कोनशिला रोवण्या्त आली. फेरी बोट किंवा अन्य बोटीतून अरबी समुद्रातून पाहिल्यावर गेटवे ऑफ इंडिया अप्रतिम दिसते. ब्रिटिश गव्हर्नर आणि अन्य महत्वाच्या व्यक्तीं साठी प्रवेशाचे ठिकाण म्ह्णून हे प्रवेशद्वार वापरण्यात यायचे. हे मुंबईतील महत्वाचे पर्यटनस्थळ आहे. ब्रिटिश काळातील भारतीय इतिहासाचे अवलोकन करण्यासाठी हे अत्यंत उत्तम ठिकाण आहे. ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांना अपोलो बंदरात उतरवून घेण्यासाठी ही पूर्ण वास्तू् बांधण्यात आली. याचे अंतिम प्रारुप जॉर्ज व्हिटेट याच्याकडून मिळाल्या नंतर मुंबईचा गव्हर्नर सर जॉर्ज सिडनॅहॅम क्लार्क याने या वास्तुची कोनशिला ३१ मार्च १९११ रोजी रोवली. याची पायाभरणी १९२० मध्ये पूर्ण झाली आणि पूर्ण बांधकाम १९२४ मध्ये झाले. व्हा‍इसरॉयने ४ डिसेंबर १९२४ रोजी याचे उद्घाटन केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर २८ फेब्रुवारी १९४८ रोजी याच वास्तुतून अखेरची ब्रिटिश तुकडी देश सोडून गेली होती आणि भारतातून ब्रिटिश सत्तेचे समूळ उच्चा्टन झाले होते.