Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
सिंधुदुर्ग किल्ला, मालवण

सिंधुदुर्ग किल्ला, मालवण

sindhudurg

सिंधुदुर्ग किल्ला समुद्रातील कुरटे बेटावर उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४-६७ मध्ये तो बांधला. हा किल्ला बांधण्यासाठी ३००० कारागीर तीन वर्षे अहोरात्र झटत होते. उत्तम जतन केलेल्या अवस्थेतील हा एक किल्ला आहे. ४८ एकरांमध्ये तो पसरला असून अरबी समुद्रात त्याची उभारणी केली आहे. आतमध्ये तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. किल्ल्यात शिवराजेश्वर मंदीर आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

नजिकचे बस स्थानकः मालवण

मुंबई ते सिंधुदुर्ग किल्लाः सायन-वाशी-पनवेल-पेण-महाड-खेड-चिपळूण-संगमेश्वर-हातखंबा-राजापूर-कणकवली-कसाल-चौके-मालवण-सिंधुदुर्ग किल्ला.

पुणे ते सिंधुदुर्ग किल्ला (कोल्हापूर मार्गे) : पुणे-सातार-कराड-कोल्हापूर-राधानगरी-दाजीपूर-फोंडा-नांदगाव-कणकवली-कसाल-चौके-मालवण-सिंधुदुर्ग किल्ला.

पुणे ते सिंधुदुर्ग किल्ला (ताम्हिणी घाटमार्गे) : पुणे-पौड-मुळशी-ताम्हिणी घाट-माणगाव-महाड-पोलादपूर-चिपळूण-संगमेश्वर-हातखंबा-राजापूर-कणकवली- कसाल -चौके-मालवण-सिंधुदुर्ग किल्ला

मुंबई ते सिंधुदुर्ग किल्ला अंतर ५३० किमी
पुणे ते सिंधुदुर्ग किल्ला अंतर ४१० किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानकः कुडाळ

सिंधुदुर्ग स्थलदर्शन

साहसी खेळ